परभणी : परभणी येथे आज महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भाजपा परभणी जिल्हा समन्वयक आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील १०वर्षाच्या कार्यकाळातील जनसामान्यासाठी राबविलेल्या योजना मुळेच तिस-या वेळी सुद्धा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक असल्याचे सांगितले. या मध्ये परभणी जिल्हा देखील मागे राहणार नसून परभणी लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती स्वीकारलेली असून कोणत्याही घटक पक्षाचा महायुतीने दिलेला उमेदवार विजयी करण्याचा दृढ विश्वास यानिमित्ताने बोलून दाखविला. माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीमध्ये मोठ्या विश्वासाने सामील झाले असून येणा-या काळात तरुणांना सोबत घेऊन लोकसभेतील उमेदवारास निवडून आणण्याचे यावेळी सांगितले. माजी आ. हरिभाऊ काका लहाने यांनी जिल्ह्यातील एकही शिवसैनिक घरात न बसता रस्त्यावर उतरून परभणीचा खासदार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
लोकसभा प्रमुख माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच देशामध्ये गोरगरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबविल्या आहेत. त्या योजना कार्यकर्त्यांनी घरोघर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना येणा-या प्रत्येक निवडणुका महायुतीच्या विचारानेच लढू आणि महायुती उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास देखील या निमित्ताने दाखवून दिला. येणा-या २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात होणार असून यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यामध्ये हा आनंद उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे.
याप्रसंगी आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी आ. मोहनराव फड, जेष्ठ नेते विजयराव वरपूडकर, भाजपा परभणी विधानसभा प्रमुख आनंदराव भरोसे, माजी महापौर प्रताप देशमुख, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, व्यंकटराव शिंदे, माधवराव कदम, एन.डी.दाभाडे, मधुकर अवचार, डॉ.सुभाष कदम, उमेश देशमुख, विलास बाबर, चंद्रकांत राठोड, दशरथ सूर्यवंशी, साहेब भोसले, अनिल नखाते, विठ्ठल मामा रबदडे, व्यंकटराव तांदळे, विद्याताई चौधरी, सुरेश भुमरे, भागवत बाजगीर, रोहन सामाले, किरण तळेकर, संतोष देशमुख यासह महायुतीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.