26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeजालनासत्तांतरासाठी बंडखोरांना भाजपने ७००० कोटी रुपये दिले : खैरे

सत्तांतरासाठी बंडखोरांना भाजपने ७००० कोटी रुपये दिले : खैरे

एकमत ऑनलाईन

जालना : राज्यात सत्तांतर व्हावे यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेना बंडखोर आमदारांना भाजपने ७००० कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही असे धक्कादायक वक्तव्य सेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केले आहे. जालन्यातील मोर्चात चंद्रकात खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही खळबळजनक वक्तव्ये केली आहेत.

संघाच्या लोकांना विचारा, संघ परिवाराला देखील आम्हीदेखील डोनेशन देतो. मात्र ते आपला पैसा तिकडे वापरतात असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. ते म्हणाले की, एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा? एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या