22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeजालनाजालना : 107 वर्षीय महिलेची कोरोनावर मात; दिला सकारात्मक संदेश

जालना : 107 वर्षीय महिलेची कोरोनावर मात; दिला सकारात्मक संदेश

एकमत ऑनलाईन

जालना : जालना येथील कोविड रुग्णालयात शहरातील माळीपुरा येथील रहिवाशी असलेल्या 107 वर्षीय महिलेसह तिच्या कुटुंबातील मुलगी ,मुलगा, नात आणि पणतु यांनी इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर मात केली असून त्यांना आज कोविड रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जालना येथील कोविड रुग्णालयात दि. 11 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जालना शहरातील माळीपुरा भागातील 107 वर्षीय वृध्द महिला या महिलेची 78 वर्षीय मुलगी, 65 वर्षीय मुलगा, 27 वर्षाची नात व 17 वर्षीय पणतु यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस यांनी केलेल्या अथक परिश्रमातुन 107 वर्षीय वयोवृध्द आजीसह त्यांच्या कुटुंबातील मुलगी,मुलगा, नात व पणतु हे कोरोनामुक्त झाले आहे.

कोरानावर मात करणा-या या आजीचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी प्रत्यक्ष भेट घेवुन संपुर्ण परिवाराचे अभिनंदन केले.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाचे योग्य निदान व उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात करणे शक्ये असून त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जालना शहरातील रहिवासी असलेल्या 107 वर्षे वयाच्या आजी आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नातून जालना शहरातील आजी कोरोनातून पूर्ण बऱ्या झाल्या असून नागरिकांनी कोरोनाबद्दल मनात कुठलीही भीती न बाळगता उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संजय जगताप, डॉ. आशिष राठोड, डॉ. प्रताप घोडके, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय आदींची उपस्थिती होती.

आर्थिक स्थैर्य आणि बँकांची स्वायत्तता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या