22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeजालनादिलासादायक : जालन्यातील सोमठाणा अप्पर दुधना प्रकल्प ओव्हरफ्लो

दिलासादायक : जालन्यातील सोमठाणा अप्पर दुधना प्रकल्प ओव्हरफ्लो

एकमत ऑनलाईन

जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सर्वात मोठा सोमठाणा अप्पर दुधना प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून पाच वषार्नंतर पहिल्यांदा हे धरण पूर्ण भरले आहे. धरण पूर्ण भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. बदनापूर तालुक्यात यंदा निसगार्ची चांगलीच कृपा आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात १३ फूट पाणी आले असून मागील पाच वषार्नंतर या धरणात एवढा जलसाठा जमा झाला आहे. बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार व संतोष वरकड यांनी या धरणातील पाणीसाठा आणि सांडवा वाहत असलेल्या ठिकाणी पाहणी करून पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना सूचना दिल्या.

सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प १९६५ मध्ये ८१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. धरणाचे पाणलोट क्षेत्र २४८ चौरस कि.मी. आहे. १९६२ मध्ये धरणाच्या बांधकामास सुरवात होऊन काम तीन वर्षात काम पूर्ण झाले होते. धरणाची उंची १७.६८ फूट आहे तर एकूण पाणीसाठा १५.३६ द.ल.घनमीटर आहे तर पाणलोट क्षेत्र २४८ चौरस किलो मीटर आहे.

या धरणाखाली समादेश क्षेत्र ५ हजार ७०८ हेक्टर तर लागवडी ५ हजार २८३ हेक्टर असून सिंचन योग्य क्षेत्र ३ हजार ४०१ हेक्टर आहे. सोमठाणा धरणातील पाणीसाठ्याचा फायदा शेतक-यांना यंदा होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. यंदा रब्बीच्या पिकांना कालव्याद्वारे पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे कोरडवाहू शेतकरीही सुखावला आहे. पाच वषार्नंतर धरणात मोठ्या प्रमाणात उपयुक्त जलसाठा झाला आहे. पाच वषार्नंतर पहिल्यांदा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

खा. चिखलीकरांचे उद्या नांदेडात आगमन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या