27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeजालनाशेतीच्या वादातून पिकावर रोटर फिरविला

शेतीच्या वादातून पिकावर रोटर फिरविला

एकमत ऑनलाईन

महिलेवर विषप्रयोगाच्या आरोपावरून वाद, जालना जिल्ह्यातील धक्कादायक घटना
जालना : जालना जिल्ह्यातील पांगरी गावात जमिनीच्या मालकीवरून महिलेवर विषप्रयोग करण्यात आल्याच्या संशयातून २ गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले असून, पिकातून रोटर फिरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. पोलिस स्टेशनला या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

शेतीच्या वादातून महिलेला विष पाजल्याच्या संशयातून दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीच्या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. शेतीचा ताबा मिळवण्याच्या वादातून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. जालना तालुक्यातील पांगरी शिवारात ही घटना घडली. या वादाचा व्हीडिओ समोर आला आहे. पांगरी शिवारात राठोड कुटुंबाच्या २० वर्षांपासून ताब्यात आलेल्या जमिनीवर माने कुटुंबानी खरेदीनुसार या जमिनीची मालकी आपली असल्याचा दावा केला आहे. खरेदीची पावती दाखवत राठोड कुटुंबाला मारहाण करत महिलेला विष पाजून उभ्या पिकांवर रोटर फिरविल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०२१ ला आपण या जमिनीची मूळ मालकाकडून इसार पावती केल्याचा एका गटाने दावा केला आहे.

माने कुटूंबाने आपल्याला मूळ मालकांनी जमीन विकली असून जमिनीचे खरेदी खतही आपण केले असल्याचे म्हटले. या जमिनीवर राठोड कुटुंबाकडून हडपण्याच्या दृष्टीने ताबा मिळवला असल्याने त्यांच्याविरुद्ध चंदणझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी विश्वनाथ राठोड यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन महिला व मुलांवर माने कुटुंबाला मारहाण आणि त्यांचे पैसे हिसकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या