आंदोलनांसाठी जंतरमंतर जागा अयोग्य

नवी दिल्ली : जंतरमंतर हे आंदोलनांसाठी योग्य ठिकाण राहिलेले नाही, असा दावा करणा-या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. आंदोलनांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून रुग्णालयांसह अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. हे प्रकरण महत्त्वाचे असल्याचे नमूद करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवले.

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, याचिकेत जंतरमंतर हे आंदोलनांसाठी आता योग्य ठिकाण राहिलेले नसल्याचे म्हटले आहे. आंदोलनांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था प्रभावित होते, तसेच वैद्यकीय सेवांसह इतर अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्यातही अडथळे निर्माण होतात, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे. हे महत्त्वाचे प्रकरण असल्याचे आम्हाला वाटते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावेळी सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल यांना या प्रकरणी केंद्र सरकारच्या सूचना घेण्यास सांगितले. त्यानंतर केंद्र सरकारला नोटीस बजावत हे प्रकरण स्वतंत्रपणे सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले.

केजरीवाल यांच्या मोर्चाचाही उल्लेख
सुनावणीदरम्यान एका वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी बैठकीचे आयोजन केले असून त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० जुलै रोजी घडल्याप्रमाणे पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली.

यंत्रणा सक्षम
यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले संबंधित यंत्रणांना परिस्थिती कशी हाताळायची हे माहिती आहे. त्यांना परिस्थिती नियंत्रणात ठेवता आली नाही आणि काही गडबड झाली तर, ते आमच्याकडे येऊ शकतात. मात्र, ते ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळतील, असा मला विश्वास आहे. या प्रकरणी केंद्र सरकारचे उत्तर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news