काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात तरुण-तरुणींनी जोरदार आंदोलन छेडले असून आतापर्यंत २० जणांचा बळी गेला असून २०० पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
काठमांडूसह अनेक शहरांत हजारो आंदोलनकारी रस्त्यावर उतरले. संसद भवनात घुसून तोडफोड, आगजनी करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधूर, पाणी फवारणी केली तर गोळीबारात अनेक जखमी झाले. या आंदोलनात मृतांचा आकडा २० वर गेला असून शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पोखरा, इटहरीतही हिंसक घटना घडल्या असून गंडकी प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली. तरुणाईच्या या ‘जेन जे- क्रांती’मुळे नेपाळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात व्यापक आंदोलन सुरु झालेले आहे. सोशल मीडियावरील बंदी विरोधात नाराज युवा वर्ग रस्त्यावर उतरला आहे. नेपाळी संसेदत हे युवक घुसले. नेपाळमध्ये जबरदस्त गदारोळ सुरु आहे. नेपाळ सरकारने राजधानी काठमांडूमधील बानेश्वरमध्ये सैन्य तैनात केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला फायरिंग करावी लागलीय. यात पाच आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. ३५ जण गोळीबारात जखमी झाले आहेत. २०० जण जखमी आहेत. राजधानी काठमांडूच्या काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर रबराच्या गोळ्या झाडल्या. बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आंदोलकांनी गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत.
काठमांडूत तणाव
काठमांडूमध्ये अजूनही तणावपूर्ण स्थिती आहे. अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा पथकांमध्ये दगडफेकीच्या घटना घडत आहेत. जखमींना एवरेस्ट आणि सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काठमांडूमधून येणारी दृश्य चिंता वाढवणारी आहेत. लोक सरकारी पोस्टर तोडत आहेत. सरकारी इमारतींमध्ये घुसत आहेत. आंदोलकांचा एक गट संसद परिसरात घुसला आहे. सुरक्षारक्षक प्रदर्शकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत आहेत. आंदोलकांच्या नाराजीच कारण सोशल मीडियावरील बंदी आहे. सोशल मीडियावर बंदी घालून भ्रष्टाचाराविरोधात आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असे जेन जीं चे म्हणण्हे आहे.
चीनच्या धर्तीवर नेपाळची कारवाई अंगलट
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना नेपाळमध्ये चीनसारखी सेन्सॉरशिप लागू करायची होती. त्यांनी चीनच्या धर्तीवर लोकांना मर्यादीत डिजिटल स्वातंत्र्य दिले. कठोर निर्बंध आणले. ओली सरकारने चीनप्रमाणे नेपाळमध्ये अचानक इंटरनेट, सोशल मीडियावर प्रतिबंध घातले. आजच्या जगातिक विश्वात हे नेपाळच्या युवा लोकसंख्येसाठी एका झटक्यासारखे आहे. त्यांच्या अभिव्यक्तीचा आधार हिरावण्यात आला आहे.
आंदोलन स्वयंफुर्तीने
नेपाळच्या जेन जी प्रदर्शनाच नेतृत्व बहुतांशष कॉलेजचे युवक, तरुण कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स करत आहेत. संघटनात्मक दृष्टीने त्यांचा स्पष्ट चेहरा समोर आलेला नाही. आंदोलन स्वयंफुर्तीने झाले. काठमांडूसह मोठ्या शहरात युवक आणि युवा विभिन्न समूहात एकत्र होऊन विरोध करत आहेत.
बंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा
नेपाळचे माजी परराष्ट्र मंत्री उपेंद्र यादव म्हणाले की, नेपाळमध्ये बेरोजगारी टिपेला पोहोचली आहे. सोशल मीडियावरील बंदीमुळे स्वरोजगार वाले सुद्धा बेरोजगार झाले. सरकारने सोशल मीडियावरील बंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा. युवकांशी संवाद साधला पाहिजे.
















