वॉशिंग्टन डीसी : नेव्हर गिव्ह अप असे म्हणत अवघ्या जगाला दोन दशकांहून जास्त काळ वेड लावणा-या जॉन सीनाने अखेर गिव्ह अप केले. पण, हे गिव्ह अप, करताना त्याच्या चेह-यावर हसू आणि डोळ्यात अश्रू होते. वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या सॅटर्डे नाईट मेन इव्हेंटमधला सामना हा जॉन सीनाच्या रेसलिंग कारकीर्दीचा शेवटचा सामना होता.
गेल्या वर्षी जुलै महिन्यातच जॉन सीनाने डब्ल्यूडब्ल्यूई विश्वातून निवृत्त होणार अशी घोषणा केली होती. तेव्हापासूनच जॉन सीनाची फेअरवेल सीरिज सुरु झाली. वर्षभरात अनेक देशांमध्ये सामने खेळल्यानंतर वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटन वन स्टेडियममध्ये जॉन सीनाची शेवटची मॅच झाली. रेसलिंग विश्वात जवळपास सगळेचं विश्वविक्रम मोडणारा, हॉलिवूडमध्येही अभिनयातून आपले कसब दाखवणारा ग्लोबल आयकॉन अशी जॉन सीनाची ओळख बनली. २३ वर्षांच्या कारकीर्दीत जॉन सीनाने २,३२० सामने खेळले. त्यापैकी एक हजार ८१८ सामने जिंकले.
जॉन सिनाचा विश्वविक्रम
– वर्ल्ड चॅम्पियन्सशीप – १७ वेळा
– यू. एस. चॅम्पियन्सशीप – ५ वेळा
– टॅग टीम चॅम्पियन्सशीप – ४ वेळा
– रॉयल रम्बल विजेता – २ वेळा
– इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन्सशीप – १ वेळा विजयी.
अनेक सामने जिंकत विक्रम
कर्ट अँकलपासून अंडरटेकरपर्यंत, शॉन मायकलपासून ब्रॉक लेसन्सरपर्यंत, सीएम फंकपासून रँडी ऑर्टनपर्यंत… इतकंच नाही तर अगदी अलीकडच्या काळातील रेसलर्स असलेल्या रोमन रिंग्जपासून कोडी -होड्सपर्यंत… जॉन सीनाने अशा अनेक चॅम्पियन्सला हरवत, एकापाठोपाठ एक सामना जिंकत, विक्रमांच्या पाय-या चढल्या.

