ज्वारी, बाजरी महागणार!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळाने पालेभाज्यांना फटका बसलेला असतानाच कडधान्य आणि तृणधान्याचे क्षेत्रही लक्षणीय प्रमाणात घटले आहे. विशेषत: खरिपातील ज्वारीसह बाजरी, मूग आणि उडदाच्या पेरणीचे क्षेत्रच ६० टक्क्यांच्या खाली आले आहे. त्यामुळे येत्या हंगामात कडधान्य आणि तृणधान्यांचा तुटवडा जाणवू शकतो.

राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने राज्यभरातील पीक पेरणीबाबत तयार केलेल्या अहवालात चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. राज्यात सरासरी १४४.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतात. यंदा सरासरीच्या ९७ टक्के म्हणजेच १४०.२६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, यातील मोठा वाटा भाताचा ज्याचा शंभर टक्के पेरा झाला आहे. तर, मक्याखालील क्षेत्र १३० टक्के आहे.

ज्वारी, बाजरी, मूग, उडदासह अन्य कडधान्ये आणि तृणधान्यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. विशेषत: खरीप ज्वारीचे क्षेत्र फक्त ३४ टक्के इतकेच आहे. तर, बाजरी ५९ टक्के, मूग ५० टक्के आणि उडीद क्षेत्र ५६ टक्के इतकेच आहे. शिवाय, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने खंड दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.

विदर्भात सोयाबीन आणि कापसाला फटका
विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम आणि अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे पूर्ण न भरणे, तर कापसाच्या पात्या आणि फुलांची गळ होणे अशा समस्या दिसून येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ट्रिगर-१ लागू झाल्याची नोंद आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही चिंता
धुळे जिल्ह्यात पावसाचा खंड राहिल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट दिसत असल्याचे पीक कापणी प्रयोगांतून नमूद करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगा चपट्या राहणे, दाणे न भरणे आणि पिकांची पाने पिवळी पडून गळणे अशा समस्या आढळल्या आहेत

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news