तिरुवनंतपूरम : केरळ गरिबीमुक्त राज्य झाल्याची घोषणा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी विधानसभेत केले. केरळ राज्याच्या स्थापना दिनानिमित्त बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंर्त्यांनी ही घोषणा केली. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री विजयन करत असलेला दावा फसवा असल्याचा आरोप केला आहे.
डावी लोकशाही आघाडी सरकार फसणूक करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विशेष अधिवेशनातून सभात्याग केला. केरळ सरकारच्या प्रयत्नातून ६२ लाख कुटुंबांना कल्याणकारी पेन्शन, ४३ लाख कुटुंबांना मोफत आरोग्य विमा वाटप करण्यात आले. त्यामुळे राज्याला दारिद्रयमुक्त करता आल्याचे विजयन यांनी स्पष्ट केले.

