29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रकोरटकरचा मुक्काम कोठडीतच

कोरटकरचा मुक्काम कोठडीतच

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक विधान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

कोरटकर कळंबा कारागृहात असून अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी त्याने केलेल्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी झाली असून त्याचा कोठडीतला मुक्काम वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकरने दिली होती. यानंतर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली होती.

सध्या कोरटकर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कळंबा येथील अंडासेलमध्ये त्यास ठेवण्यात आले आहे. आज मंगळवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. यामुळे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले होते.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रशांत कोरटकरने केले होते. तसेच कोरटकरने इंद्रजित सावंत यांना देखील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ज्याप्रकरणी कोल्हापूर येथील जूना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण तब्बल १ महिना कोरटकर पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी त्याला तेलंगणा येथून जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR