पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील येरवडा परिसरात २० ते २५ गाड्यांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. यामध्ये कार, दुचाकी आणि रिक्षांचा समावेश आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंबंधी काही नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस अद्याप या घटनेचा आणि अज्ञात व्यक्तींचा तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्या राग आणि वादातून मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला धक्काबुक्की करून कंपनीच्या चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना पुण्यात शनिवारी घडली आहे. हा प्रकार ताडीगुत्ता नदीपात्रात मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.