परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव तथा सिनेट मेंबर प्रा. सौ. शीतल किरण सोनटक्के यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत परभणीच्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती व सावित्रीबाई फूले महिला वसतिगृहाच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी जि. प. माजी अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, माजी सभापती मीनाताई राऊत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची उपस्थिती होती. यापूर्वी प्रा. शीतल सोनटक्के यांना राज्यस्तरीय राजमाता जीजाऊ पूरस्कार, त्याग मूर्ती रमाई पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सावित्री मंचच्या माध्यमातून महिला आणि मूलींच्या मानसिक सक्षमीकरण व आर्थिक सबलीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम तळमळीने राबवत असतात. यामूळे संपूर्ण जिल्ह्यात महिलांसाठीच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. क्रांतीज्योती पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. सौ. शीतल सोनटक्के यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

