मुंबई : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव लवकरच विवाहबद्ध होणार आहे. याच कारणासाठी त्याने बीसीसीआयकडे काही दिवसांच्या सुट्टीची मागणी केली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून त्यानंतर वनडे आणि टी २० सीरीजही खेळल्या जाणार आहेत. सुट्टीची परवानगी मिळाल्यास कुलदीप सीरीजच्या मध्यातच संघातून बाहेर जाऊ शकतात.
कुलदीप महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लग्नाच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी त्याने इउउक कडे रजा मागितली आहे. आयपीएल काही दिवसांनी पुढे ढकलले गेल्यामुळे त्यांचा लग्नाचा प्लॅन आधी रद्द झाला होता. आता परत योग्य वेळ मिळाल्याने ते लग्न करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कुलदीपला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुटी हवी आहे. २२ नोव्हेंबरला गुवाहाटीत दुसरा कसोटी सामना होणार आहे. ३० नोव्हेंबरला रांची येथे पहिला वनडे होणार आहे, लग्नासाठी सुट्टी मिळाल्यास ते हे दोन्ही सामने मिस करू शकतात. कुलदीपची साखरपुडा त्याची मैत्रीण वंशिकासोबत झाला आहे. वंशिका एलआयसीमध्ये काम करते.

