26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रउमेदवारांच्या विजयावर लाखांच्या पैजा

उमेदवारांच्या विजयावर लाखांच्या पैजा

कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ तासांवर येऊन ठेपल्यानंतरही कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झालेला नाही. आपलाच नेता निवडून येणार यासाठी चौकाचौकात चर्चा रंगल्या असताना लाखांच्या पैजांचे बोल बाहेर पडू लागले आहेत. विरोधक उमेदवारांच्या कार्यकर्ते गाठून कोल्हापूर दक्षिण राधानगरी कागल विधानसभा मतदारसंघात लाखभरांच्या पैजा आता लागल्या आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे, ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक, प्रकाश अबिटकर विरुद्ध के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाखांच्या पैजा लागलेल्या दिसत आहेत. त्याचे आव्हान देणारे फलक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली आहे. दोन शिवसेनेमध्ये ही लढत होत असली तरी कार्यकर्ते मात्र ईर्षेला पडले आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक असलेल्या राजाराम भाटळे यांनी राधानगरीतून २५ लाख रुपयांची पैज लावून आव्हान दिले आहे. तर याला उत्तर देत अनेकांनी मी २५ लाखांची पैज लावायला तयार आहे असे प्रति आव्हान दिले आहे. यावेळेस जबरदस्त ईर्षा आणि आत्मविश्वास दिसत आहे.
आमदार प्रकाश आबिटकर कोणत्याही परिस्थितीत हॅट्ट्रिक साधणार हा कार्यकर्त्यांचा दावा आहे.

तर के. पी. पाटील हे लय भारी ठरणार हा मुद्दा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. पैजा लागल्या आहेत. कसबा वाळवे येथील अमेय पाटील आणि पांडुरंग कोकाटे या दोन कार्यकर्त्यांमध्ये २५ हजार रुपयांची पैज लागली आहे. एका मध्यस्थामार्फत पैसेही जमा केले आहेत.

या मतदारसंघातील बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे यांनी के. पी. पाटील निवडून येणार. कोणाच्यात हिम्मत असेल तर २५ लाखांची पैज लावा असे आव्हान केले. खरे तर ही इतकी मोठी पैज हेच मोठे आव्हान आहे. ही २५ लाखांची पैज लावण्याचे धाडस एखादा कार्यकर्ता करतो आणि यालाही आमदार आबिटकर यांचे कार्यकर्ते कमी पडलेले नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR