16.2 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeहिंगोलीहिंगोलीत कारमध्ये सापडली मोठी रोकड

हिंगोलीत कारमध्ये सापडली मोठी रोकड

मतदानाला अवघे काही तास, पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू

हिंगोली : हिंगोली शहरात एका बॅगमध्ये मोठी रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. १००, २००, ५०० आणि ५० रुपयांच्या नोटांचे बंडल पांढ-या रंगाच्या बॅगमध्ये आढळून आले आहेत. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे.

हिंगोली शहरांतील शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या पथकाने टाटा नेक्सन कंपनीच्या चार चाकी गाडीमधून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी या चार चाकी गाडीची तपासणी केली असता, त्यात बॅगमध्ये मोठी रक्कम आढळून आली. या बॅगमधील संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले होते.

राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या २ डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यासाठी, प्रचाराची वेळ अवघ्या काही तासांत संपणार असून नेते, कार्यकर्ते उत्साहा आहेत. एकीकडे मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुसरीकडे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून पैसे वाटप, आमिष दाखवून होणा-या इतर वस्तूंच्या वाटपाकडे लक्ष ठेऊन आहे. त्यातच,

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR