गणेशोत्सवात यंदा पुण्यात लेझर लाईटवर बंदी

पुणे : प्रतिनिधी
देशभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून पुण्यातील सांस्कृतिक, पारंपरिक गणपती उत्सवासाठी येथील मंडळे सज्ज झाली आहेत. मात्र, यंदाही पुण्यातील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने डीजे, ध्वनीक्षेपक आणि लेझर लाईट, धांगडधिंगा हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला आहे. त्यातच आज पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुण्यात गणेशोत्सव काळात लेझर लाईटला बंदी राहणार असून, ध्वनिप्रदूषणाचे नियम न पाळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही जिल्हाधिका-यांनी दिला. त्यामुळे यंदा धांगडधिंग्याला काही अंशी का होईना रोखण्यास मदत होणार आहे.

पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून आता गणेशोत्सवात डीजे बंदी आणि ध्वनी प्रदूषणाविरुद्ध मोहीम सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा आग्रह धरला असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ त्यांनी दिला. त्याच पार्श्वभूमीवर आता अनेक पुणेकरांनी एकत्र येत ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक रहदारीच्या मुद्यावरून भूमिका मांडली तर जिल्हाधिका-यांनीही कायदेशीर भूमिका मांडली. दरम्यान, लेझर लाईटमुळे भाविकांच्या डोळ््यांवर विपरित परिणाम होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे यालाही विरोध होत आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात पुणे शहरात लेझर लाईटवर बंदी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. तसेच गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणासंदर्भाने नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई होणार, असे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचेही डुडी यांनी सांगितले. पुण्यात कोर्टाच्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी सर्व गणेश मंडळांसोबत बैठका घेऊन नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे गणेश मंडळांना डीजेबाबत न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे,

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा
ध्वनी प्रदूषणाबाबत कोर्टाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन डुडी यांनी केले तर नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार, असेही जिल्हाधिका-यांनी ठणकावले. त्यामुळे लेजर लाईटची चमक कुठेही दिसणार नाही आणि डीजेसारखे ध्वनिप्रदूषणाचे वाद्यही फारसे वाजविले जाण्याची चिन्हे नाहीत. कारण संबंधित मंडळावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सवातील डीजे आणि कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने लढा देत असताना आता आणखी एका पुणेकराने या गंभीर प्रश्नावर थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत.

आयोगाची प्रदूषण मंडळाला नोटीस
पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नागपुरातही डीजेविरुद्ध जनचळवळ उभारणार
पुण्यानंतर आता नागपुरातही डीजे बंदीसाठी जनचळवळ उभारण्याची तयारी सुरू झाली. विधानपरिषदेचे माजी आमदार नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. विविध सण आणि उत्सवांत डीजेचा भयानक आवाज त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे डीजेवर पूर्ण बंदी घातली पाहिजे, असे जोशी म्हणाले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news