‘डिजिटल पोलिसिंग’मध्ये ‘लातूर पॅटर्न’ देशात अव्वल

लातूर : गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत लातूर जिल्हा पोलिस दलाने डिजिटल पोलिसिंगमध्येही ‘लातूर पॅटर्न’ निर्माण केला आहे. ई-साक्ष्य आयडी तयार करून ते संबंधित गुन्हे व एफआयआरशी लिंक करण्याच्या कामात लातूर जिल्ह्याने तब्बल ९९.९८ टक्के कामगिरी नोंदवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून (एनसीआरबी) प्राप्त माहितीतून ही कामगिरी समोर आली आहे.

लातूरच्या पाठोपाठ सिक्कीममधील एका जिल्ह्याने द्वितीय, तर हरयाणातील रेवारी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. जवळपास शंभर टक्के कामगिरीमुळे डिजिटल पुराव्यांच्या व्यवस्थापनात लातूर पोलिसांनी राष्ट्रीय पातळीवर आपली कार्यक्षमता अधोरेखित केली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील छायाचित्रे, व्हीडीओ तसेच अन्य डिजिटल पुरावे अधिकृत पद्धतीने नोंदवून त्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया ई-साक्ष्य प्रणालीद्वारे केली जाते. हा ई-साक्ष्य आयडी संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडल्यामुळे पुराव्याचे डिजिटल व्यवस्थापन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होते. न्यायालयीन प्रक्रियेतही या नोंदी महत्त्वपूर्ण ठरतात. तंत्रज्ञानाचा स्वीकार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अधिकारी-अंमलदारांच्या टीमवर्कच्या जोरावर लातूर पोलिसांनी डिजिटल पोलिसिंगमध्ये देशात हे अव्वल स्थान मिळविले आहे.

ई-साक्ष आयडी निर्मिती, लिंकिंग म्हणजे काय?
ई-साक्ष प्रणालीत गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील फोटो, व्हीडीओ व अन्य डिजिटल पुरावे अधिकृतरीत्या नोंदवून त्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक (एसआयडी) दिला जातो. हा क्रमांक संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडला जातो. त्यामुळे डिजिटल पुराव्याची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि पारदर्शकता राखण्यास मदत होते.

समन्वय कामी आला : पोलिस अधीक्षक तांबे
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार ई-साक्ष्य आयडी निर्मिती व लिंकिंगच्या कामाला जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आले. सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांकडून हे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करून घेण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे सातत्याने मॉनिटरिंग केले. कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा, आवश्यक सूचना आणि अधिकारी-अंमलदारांशी समन्वय यामुळे हे काम प्रभावीपणे पूर्ण झाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news