22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरभारनियमनमुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त

भारनियमनमुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : कडक उन्हाळ्यात भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागात सध्या लोडशेंिडग होत असल्याने दिवसा उकाड्याने हाल होत असताना सायंकाळी डासांचा त्रास सहन करावा लागत असून सर्वत्र अंधार पसल्याने घरोघरी गोड तेलाचे दिवे पहायला मिळत असून या भारनियमन मुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यात सध्या महावितरण कडून वीज कपात सुरू असून पहाटे व सायंकाळी चार तास भारनियमन सुरु आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात महत्वाची वेळ म्हणजे सायंकाळच्या वेळी भारनियमन होत आहे. सर्वत्र अंधारामुळे अडगळीत पडलेले दिवे घराघरातून बाहेर निघाले. मात्र सरकारकडून रॉकेल बंद केल्याने घरोघरी गोड तेलाचे दिवे लावावे लागत आहेत त्यामुळे हे भारनियमन बंद करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दरम्यान सरकारने स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे रॉकेल बंद केले आहे. तर बाजारात मिळणारे पांढरे रॉकेल बंद झाले आहे. त्यामुळे दिवा लावणे कठीण झाले आहे. तर त्यात मेणबत्तीचे दर वाढले असल्या ती ही परवडणारी नसल्याने नागरिकांना अंधारात बसावे लागत असून त्यात काही जण तर चक्क गोड तेलाचा दिवा लावून उजेड करीत आहेत. काही जण मोबाईल टार्चवर अडचण भागवित आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. असे असतानाच कोळसा उपलब्ध नसल्याने अपु-या वीज निर्मितीमुळे विजेची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरासह ग्रामीण भागात विजेचे भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणने जाहीर केले असले तरी याचा फटका नागरिकांना बसत आहे. कडक उन्हाळ्यात भारनियमन ग्रामस्थांच्या चांगलेच मुळावर आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या