कोळनूर : जळकोट तालुक्यातील कोळनूर येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यामध्ये लातूर जिल्हा तसेच नांदेड जिल्ह्यातून अनेक मल्लांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम कुस्तीही जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील अजीम सय्यद व नळेगाव येथील आयुब शेख यांच्यात अटीतटीची झाली. यामध्ये उत्कृष्ट डाव टाकत आयुब शेख यांनी अजीम सय्यद यांचा पराभव केला व अखेरची कुस्ती सात हजार रुपयांची पटकावली.
या कुस्तीमध्ये जुनेद सय्यद, नारायण नागरगोजे, नामदेव वाडकर, राजीव ंिदडे, शेख महंमद , नारायण केंद्रे, बाबाराव भोसले महादेव केंद्रे आदी कुस्तीगिरांनी कुस्तीमध्ये सहभाग नोंदवून विजय संपादन केला. याप्रसंगी सरपंच रमेश चोले, भाजपाचे नेते बालाजी केंद्रे, अरंिवंद नागरगोजे, उस्मान मोमीन, तलाठी आकाश पवार, उपसरपंच तुळशिदास पांचाळ, माजी सरपंच जनार्धन चोले, सुरेश चोले , रावसाहेब नरवटे पाटील, जीवन पांचाळ, वसंत चोले ग्रामपंचायत सदस्य, तातेराव चोले, संतोष मुळे, बालाजी शिवशेट्टे, धोंडीराम चोले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ओंकार सोनटक्के, पत्रकार नाना पवार, शिवशंकर काळे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य मनसेचे बाळासाहेब शिवशेट्टे , शिवाजी पाटिल, नंदू शिवशेट्टे, प्रकाश नरवटे, गोपीनाथ चोले, पत्रकार राम चोले, उमाकांत काळे यांच्यासह गावातील अनेक नेते मंडळींची उपस्थिती होती.