18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूर...अखेर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला

…अखेर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अंबाजोगाई रोडवरील नवीन रेणापूर नाक्याच्या पुढील भाग जो कोणत्याही हद्दीत नव्हता. या भागासाठी प्रशासनाकडे मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी काकाज ग्रुपचे अध्यक्ष विजयकुमार धुमाळ यांच्यामार्फत सतत पाठपुरावा चालूच होता. त्यातूनच पाण्याच्या पिण्याची पाईपलाईन कामास मंजुरी मिळून त्याचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त संचालीका तथा नगरसेविका सपनाताई किसवे, महापालिका क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, काकाज ग्रुपचे अध्यक्ष विजयकुमार धुमाळ यांच्याबरोबरच याच भागातील नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी तहसीलदार राजकुमार खटके, माजी शिक्षणाधिकारी राम गारकर, डॉ. अशोक मुंडे, बँकेचे चेअरमन पवार, विस्तार अधिकारी श्रीमंत हाके, ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीमंत पोळ, काकाजी इंग्लिश स्कूलचे सचिव काकासाहेब धुमाळ, कृषी सहाय्यक श्रीमंत भताने इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी विजयकुमार धुमाळ म्हणाले की, या भागातील नागरिकांनी विकासाची गंगा चौफेर होण्यासाठी मतदार नोंदणी आवयक आहे. या परीसरातील हजारोंच्यावर नागरिकांनी नोंदणी केली असून उर्वरीत नागरिकांनी दि. ३० नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करावी. त्यामुळे येणा-या काळात सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख आपल्या भागाकडे विशेष लक्ष देऊन नव्याने झालेल्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक टिळे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राचार्य विनोदकुमार धुमाळ यांनी केले. आभार प्रदर्शन गंगाधर तेलंगे यांनी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या