29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरअतनूर परिसरात गारांसह जोरदार पाऊस

अतनूर परिसरात गारांसह जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

जळकोट : चार-पाच दिवसांपासून जळकोट तालुक्यात ढगाळ वातावरण होते मात्र दि १३ जानेवारी रोजी सायंकाळी सात ते साडे आठच्या दरम्यान तालुक्यातील अतनूर सह सुलाळी, मरसांगवी, डोंगरगाव, परिसरात ढगांच्या गडगडाटासह तब्बल एक तास गारांचा पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्­या स्वरूपाचा पाऊस झाला अतनूर परिसरात १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट सुरु झाला होता. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच साडेसहा वाजता वा-यासह अवकाळी पावसाने झोडपले. काही मिनिटातच प्रचंड गारा पडल्या. सर्वत्र गारांचा खच पडला होता.

गाराचा पाऊस तब्बल एक तास सुरू होता. त्यातच महावितरणची वीज गुल झाली. यात शेतातील रब्बी पिकांचे हरभरा, गहू , तूर यांचे मोठे नुकसान झाले आहे. रानातील झाडांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाल्याने शेतक-यांतचिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक शेतक-यांच्या तुरीच्या ढिगात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. गारांच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव परगे, शिवसेना युवा तालुकाप्रमुख उमाकांत ईमडे, अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे, शिवसेनेचे जळकोट तालुका उपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश केंद्रे, शेतकरी किशन मुगदळे, बी.जी.शिंदे, छगनंिसग चव्हाण, कुमार गौशेठवारसह शेतक-यानी केली आहे. तसेच रब्बीचा पीक विमा ही मंजूर करावा अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या