22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरअतिक्रमणाविरोधात मनसेचा येरोळ मोड येथे रस्ता रोको

अतिक्रमणाविरोधात मनसेचा येरोळ मोड येथे रस्ता रोको

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील
येरोळ येथील अतिक्रमण हटवण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने येरोळ मोड येथे रस्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने येरोळ येथील अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून तुकाराम लोंढे यांचा अतिक्रमण विरोधी लढा चालू होता व त्यांनी अहमदपूर मनसे तालुकप्रसिद्धीप्रमुख कृष्णा जाधव यांच्याकडे न्याय देण्याची विनंती केली होती म्हणून मनसेने हे तीव्र आंदोलन केले. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेत या मागणीच्या अनुषंगाने संबंधित जागेवरील अतिक्रमण काढण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, तालुकाध्यक्ष सुकेश गुरमे, तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे चाकूर, उपाध्यक्ष तुळशीदास माने, विभागाध्यक्ष निलंगा सुभाष कांबळे, तक्रारदार तुकाराम लोंढे, उद्धव लोंढे, माधव कसबे, कृष्णा गिरी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या