22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरअतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला ‘खो’

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला ‘खो’

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह परिषदेच्या अंतर्गत मराठी व उर्दु खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त १६३ शिक्षकांपैकी ९४ शिक्षकांचे समायोजन समुपदेशन पद्धतीने शुक्रवार दि. १० जून रोजी विविध शाळेतील रिक्त जागेवर करण्यात आले होते. समायोजन झालेल्या शिक्षकांना तात्काळ रूजू होण्याच्या सुचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या होत्या. मात्र २० दिवस उलटून गेले तरी संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी विविध कारणे देवून समायोजन करण्यासाठी ‘खो’ दिला जात आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि. १० जून रोजी मराठी व उर्दु खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रीया पार पडली. खाजगी प्राथमिक शाळेतील समायोजणेसाठी मराठी माध्यमाचे ११४ अतिरिक्त होते. त्यापैकी ६७ शिक्षकांचे समायोजन खाजगी शाळेतील रिक्त असलेल्या जागेवर करण्यात आले. त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाचे ४९ अतिरिक्त शिक्षक होते. त्यापैकी २७ शिक्षकांचे समायोजन खाजगी उर्दु प्राथमिक शाळेतील रिक्त पदावर करण्यात आले. उर्वरित मराठी माध्यमातील ४७ शिक्षक व उर्दू माध्यमातील २२ शिक्षकांचे समायोजन जागा रिक्त नसल्यामुळे करता आले नाही. त्यामुळे लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अतिरिक्त शिक्षकांची यादी सादर केली होती.

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना तात्काळ समायोजन झालेल्या शाळेत रूजू होण्यासाठी सांगीतले होते. शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला २० दिवस होऊनही मुख्याध्यापक समायोजन झालेल्या शिक्षकांना विविध कारणे देवून समायोजन करण्यास विरोध करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी यांना पत्र काढून थेट शाळून जावून शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

…तर ते पद व्यापगत होणार
मराठी व उर्दु खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त १६३ शिक्षकांपैकी ९४ शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने २०१८ नंतर समायोजन करण्यात आले. या शिक्षकांना समावून घेण्यास खाजगी शाळांनी नकार दिल्यामुळे २० दिवसात केवळ ४ ते ५ शिक्षकांचे समायोजन झाले आहे. समायोजन करून घेण्यास नकार देणा-या शाळेतील पदे व्यापगत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी करणार विचारणा
खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी येत असलेले आडथळे पाहता शिक्षण विभागाने गट शिक्षणाधिकारी यांना पत्र काढले आहे. त्यामुळे सदर खाजगी शाळेत त्या शिक्षकांचे रिक्त पदावर का समायोजन झाले नाही याची शहानिशा गटशिक्षणाधीकारी करणार आल्याची माहिती लातूर जि. प. च्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या