23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरअवैध वाळू वाहतूक प्रकरणी १ कोटी १३ लाखांचा दंड वसुल

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी १ कोटी १३ लाखांचा दंड वसुल

एकमत ऑनलाईन

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तहसील कार्यालयाने अवैध वाळू वाहतूक व उत्खनन प्रकरणी सन २०१९-२०२० ते २०२१-२०२२ या कालावधीत १ कोटी १३ लाख ४९ हजार ४० रुपयांची दंडात्मक रक्कम वसुल केली असून अवैध वाळू वाहतूकीने वांजरखेडा-औराद रस्ता खराब झाल्याची एकही तक्रार निलंगा तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालय निलंगा येथे प्राप्त झालेली नाही, अशी माहिती निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली.

निलंगा तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील अवैध वाळु व उत्खनन प्रकरणी सातत्याने नियमितपणे कारवाई केली जात असते. गेल्या महिन्यात ५ ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी ३ ट्रॅक्टर औराद शहाजानी येथे पकडण्यात आलेले आहेत. तसेच दि. २८ मे २०२२ च्या मध्यरात्री महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अवैध वाळू उत्खनन करणा-या दोन बोटी नष्ट केल्या आहेत. असे असताना चुकीच्या माहितीच्या आधारे महसूल विभागाविषयी गैरसमज निर्माण होता कामा नये. शेतक-यांनी या रस्त्याची तक्रार न करता तो रस्ता खराब झाला म्हणणे चुकीचे आहे, असेही तहसीलदार गणेश जाधव यांनी नमुद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या