31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeलातूरअहमदपूर पाणीपुरवठा निकृष्ट कामाचे लेखापरीक्षण करून चौकशी करावी

अहमदपूर पाणीपुरवठा निकृष्ट कामाचे लेखापरीक्षण करून चौकशी करावी

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर शहरातील नागरिकांना दोन ते तीन दिवसाला सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी ४४ कोटी ५८ लाख रुपयांच्या नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम आर जे सानप कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. पण त्यांनी दोन वर्षात योजनेचे काम पूर्ण करणे गरजेचे असताना पाच वर्षे होऊनही योजना अद्यापही नगर परिषदेकडे हस्तांतरण केली नाही. गुत्तेदाराने केलेल्या सर्व निकृष्ट कामाच्या योजनेचे लेखापरीक्षण करून चौकशीची मागणी माजी नगरसेविका कमलबाई आगलावे यांनी आयुक्ताकडे केलीली आहे.

महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत अहमदपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम दोन वर्षात पूर्ण करून शहरवाशियांना पाणीपुरवठा करणे आवश्यक होते. आर. जे. सानप कन्स्ट्रक्शन या गुत्तेदाराने लिंबोटी धरणातील मुख्य पाणीपुरवठा करण्यात येणारी विहीर ज्या संकेतस्थळी खोदायची होती त्याच्यापासून दहा मीटर अलीकडे खोदण्यात आली आहे. धरणापासून अहमदपूर शहरापर्यंतचे मुख्य जलवाहिनीचे १९ किलोमीटरचे काम निकृष्टमुळे जलवाहिनी नेहमी फुटून लिकीज होत आहे. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. याबरोबरच शहरातील पाईपलाईन ही अंदाजपत्रकानुसार दीड मीटर जमिनीत खोल खोदून न टाकता दोन ते तीन फुटावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईपलाईन नेहमी फुटत आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी विलंब होत आहे. शहराला वीस दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत असून या सर्व गोष्टीला फक्त गुत्तेदार जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या योजनेमधील दोन नवे जलकुंभ आहेत. यातील एक २१ लक्ष लिटरचा जलकुंभ हा अगदी निकृष्ट असल्यामुळे यातून पाणी गळती होत आहे. यासाठी गुत्तेदाराने काहीही केले नाही. या जलकुंबाच्या खालच्या बाजूला एक हजार लोक वस्ती आहे. यांना कधी धोका होईल हे राम भरोसेच आहे. गुत्तेदार कोणाचेही ऐकत नाही. नगरपालिकेने कामात हायगय व खुप उशीर केल्यामुळे त्यास एकावेळी वीस लाख रुपये व दुस-या वेळी ४९ लाख रुपये अशी ६९ लाख रुपये दंड ठोठावला होता. याबरोबरच गुत्तेदाराने ही योजना दोन वर्षात काम पूर्ण करून एक वर्ष शहराला सुरळीत पाणीपुरवठा करून ही योजना नगर परिषदेकडे हस्तांतरण करणे बंधनकारक होते. पण आज पाच वर्ष होऊन सुद्धा गुत्तेदाराने अनेक कामे अपूर्ण ठेवलेले आहेत. म्हणून नगर परिषदेने एक ते २१ कामे पूर्ण केले नाहीत म्हणून १० जानेवारी २३ रोजी गुत्तेदाराला खरमरीत नोटीस बजावली आहे. नगरपरिषदेकडून गुत्तेदाराचे नांव काळया यादीत टाकावे म्हणून ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेला आहे. पण अद्यापही कसलाच निर्णय घेण्यात आला नाही.

गुत्तेदार सानप यास न्यायालयात खेचण्यात येऊन कामात अति विलंब केल्यामुळे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार नगर परिषदेमध्ये दोन वेळा ठराव घेऊन तब्बल ६९ लाख रुपये दंड ठोठावला होता तसेच गुत्तेदाराने योजनेचे काम वेळेत पूर्ण करून योजना हस्तांतरण केल्यानंतरच याची अनामत सुरक्षा रक्कम परत करण्यात यावे असे असतानाही तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कोठेमाशी शिंकली माहीत नाही. पण गुत्तेदाराच्या सर्व चुका माफ करून नगरपरिषदेने लावलेले दंड, अनामत सुरक्षा रक्कम देता येत नसतानाही अनाधिकृतपणे देण्यास भाग पाडले.

गुत्तेदाराने शहरातील पाईपलाईनचे काम करतेवेळी सिमेंट काँक्रीटचे खोदून ठेवलेले अनेक रस्ते दुरुस्त केले नाहीत, शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकलेली नाही, पाईपलाईन अनेक भागात फुटत आहे. या सर्व अंदा धुंद कारभाराची चौकशी करून लेखापरीक्षण करून गुत्तेदारांवर दंडात्मक कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी माजी नगरसेविका कमलाकर आगलावे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. याबरोबरच अशा निकृष्ट काम करणा-या व कामात अति विलंब लावणा-या गुत्तेदारास या तालुक्यातील कुठलेही काम यापुढे देण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या