26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरआंतरविद्याशाखीय संशोधन प्रणाली प्रभावी ठरणार

आंतरविद्याशाखीय संशोधन प्रणाली प्रभावी ठरणार

एकमत ऑनलाईन

निलंगा : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आंतरविद्याशाखीय संशोधन प्रणाली प्रभावी ठरणार असल्याचे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांनी व्यक्त केले. येथील महाराष्ट्र महावद्यिालय, निलंगा आणि कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ जि. परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय बहूविद्याशाखीय चर्चासत्र डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह, निलंगा येथे करण्यात आले होते.ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाल की, दोन महाविद्यालये एकत्र येऊन बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात अनेक अडचणी असतात आणि कांही मर्यादा ही पडतात.

मात्र त्यावर मात करून महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा आणि कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ यांनी आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन चांगला पायंडा पाडला आहे. इथून पुढे भविष्यात नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत अशा आंतरविद्याशाखीय संशोधन प्रणालीच प्रभावी ठरतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी सॅलस्बिरी विद्यापीठ, अमेरिकेचे अतिथी प्रा डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी दिल्ली विद्यापिठातील संशोधक प्रा.डॉ.ज्योती पौळ, वडोदरा विद्यापीठातील संशोधक प्रा डॉ. दृष्टी जैन आणि आफ्रिकेतील नायजेरिया विद्यापीठातील संशोधक प्रा डॉ. बाबालोला सॅम्युअल या साधन व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अजित मुळजकर व डॉ. गोंिवद शिवशेट्टे यांनी केले तर आभार डॉ. नरेश पिनमकर यांनी मानले.या परिषदेसाठी विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रमाकांत घाडगे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, डॉ. सातपुते,डॉ. भागवत पौळ, प्राचार्य डॉ. एस.एस. पाटील महाराष्ट्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, प्रा. प्रशांत गायकवाड आणि परिषदेचे निमंत्रक डॉ. मारुती कचवे हे उपस्थित होते.चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील डॉ. धनंजय जाधव, डॉ. अरुण धालगडे, प्रा. सुरेश कुलकर्णी, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. हंसराज भोसले, डॉ. अजित मुळजकर, डॉ. नरेश पिनमकर, डॉ. जी.जी. शिवशेट्टे, डॉ. शेषेराव देवनाळकर, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. विठ्ठल सांडूर, डॉ. सुभाष बेंजलवार, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या