26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरआज रॅली, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

आज रॅली, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा हा सर्वात कमी वृक्षाच्छादित क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात मोडतो, त्यामुळे येणा-या काळात हे क्षेत्र झपाट्याने वाढावे म्हणून जिल्हा प्रशासन याची सुरुवात २४ जुलै रोजी सकाळी ११.११ वाजता पाच किलोमीटर मानवी साखळी करुन मांजरा नदीच्या दुतर्फा २८ हजार वृक्ष लागवड करणार आहे. त्यासंदर्भातील जनजागृती रॅली आज दि. २१ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौकाला वळसा घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे समारोप होईल. यासाठी शहरातील अधिकाधिक नागरिकांनी या वृक्ष लागवड जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा, विविध स्वयंसेवी संस्था, मांजरा नदी काठावरील गावचे सरपंच, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी हे आवाहन केले. मांजरा नदीच्या काठावरील ज्या गावात वृक्षारोपण होणार आहे, तेथेही २१ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या सहभागाने प्रभात फेरी होणार आहे. ही वृक्षारोपण जन चळवळ व्हावी यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावात कमीत कमी अडीच हेक्टर क्षेत्रात ऑक्सिजन पार्क होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या