लातूर : प्रतिनिधी
जून महिना संपत आला तरी ग्रामीण भागात दमदार पाऊस न झाल्याने पाण्याचे स्त्रोत अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे लातूर जिल्हयात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरीकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी म्हणून जिल्हयातील ३२ गावांसाठी व १२ वाडया, तांडयावरील नागरीकांसाठी पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतींनी पंचायत समिती स्तरावर ४९ अधिग्रहाणाची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी केलेल्या मागणीनुसार जिल्हयातील १४ गावे, ५ वाडयावर २० अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसात आणखी पाच अधिग्रहणाची भर पडली आहे.
यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पाणी टंचाaईच्या झळा जाणवत आहेत. लातूर जिल्हयात ८७.६ मिलीमिटर पाऊस झाला आहे. जिल्हयात दमदार पाऊस अद्याप न झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींच्याकडून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे येऊ लागले आहेत. जिल्हयातील ३२ गावांसाठी व १२ वाडया, तांडयावरील नागरीकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर ४९ अधिग्रहाणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.
यात लातूर तालुक्यातून तांडयासाठी १ अधिग्रणांची मागणी, औसा तालुक्यातील २ वाडया व ३ गावांसाठी ५ अधिग्रहणाची मागणी, निलंगा तालुक्यातील १ गावासाठी २ अधिग्रहणांची मागणी, अहमदपूर तालुक्यील २० गावे व ६ वाडयासाठी ३० अधिग्रहणाची मागणी, उदगीर तालुक्यातील ५ गावांसाठी १ वाडीसाठी ६ अधिग्रहणांची मागणी, तर
जळकोट तालुक्यातील ३ गावे, २ वाडयांसाठी ५ अधिग्रहणाच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या स्तरावर करण्यात आले आहेत. या गावातील नागरीकांना पाणी टंचाईच्या झळा जानवत आहेत. तसेच अहमदपूर तालुक्यातील एका गावास ट्रँकरद्वारे
पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.