22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरआपत्कालीन स्थितीत एनसीसीचे कार्य उल्लेखनीय

आपत्कालीन स्थितीत एनसीसीचे कार्य उल्लेखनीय

एकमत ऑनलाईन

निलंगा : आपतकालीन स्थितीत एनसीसीचे कार्य उल्लेखनीय राहिलेले आहे. या कार्याबद्दल कौतुक झाले आहे. भूकंप असेल किंवा कोवीड १९ असे यात दखलपात्र कार्य झाले आहे, असे प्रतिपादन एनसीसीचे अधिकारी मेजर डॉ. चंद्रकुमार कदम यांनी केले. महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे सात दिवसीय एनसीसी वार्षिक शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

कदम म्हणाले की, १९९३ च्या किल्लारी भूकंपानंतर एनसीसीला मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी ५३, महाराष्ट्र बटालीयन एनसीसीने अत्यंत उत्स्फूर्तपणे आपले कर्तव्य बजावले. ज्याला देशाच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदक देऊन गौरविले होते. कोव्हीड-१९ च्या दुस-या लाटेत महाराष्ट्रातील केवळ दोन एनसीसी बटालियनने कर्तव्य बजावले होते. त्यापैकी लातूर एनसीसी बटालियन हे एक आहे.

त्यामध्ये महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील एनसीसीचे १० विद्यार्थी कोविड-१९ च्या महामारीत जीवाची पर्वा न करता मार्च-एप्रिल २०२१ या कालावधीत रस्त्यावर उतरुन स्वत:ला जनसेवेत झोकुन दिले. याची नोंद महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली व दि. १५ जुलै २०२१ रोजी एनसीसी अधिकारी व एनसीसी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित केले. शिवाय केंद्र शासनाच्या दरबारीही याची नोंद घेतल्याचा दुजोरा संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेला आहे, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी अध्यक्षीय समारोपात केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्पोरल प्रिया बिरादार, लान्स कार्पोरल स्रेहा सूर्यवंशी यांनी मानले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या