26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरआभाळ, वाढत्या धुक्यामुळे तुरीचा झाला खराटा

आभाळ, वाढत्या धुक्यामुळे तुरीचा झाला खराटा

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : कृषि प्रधान देशामध्ये निसर्ग हा बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. गतवर्षी सह याहीवर्षी शेतक-यांचे नगदी पीक समजले जाणारे तुरीचे पीक हे सतत पंधरा ते वीस दिवसांपासून आभाळ भरुन येत असल्यामुळे, दूषित वातावरण, आभाळामूळ या भागातील तुरीची फुले गळुन जात आहेत. काही ठिकाणी तर तुरीचा चक्क खराटा झाल्याचे, तर काही भागात तूर आपोआप वाळून गेली आहे. याबाबतचे निवेदन शिरूर ताजबंद महसूल मंडळातून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे शेतकरी शिवानंद भोसलेसह शिष्टमंडळाने दिले
आहे.

शिरूर ताजबंद महसूल मंडळासह तालुक्यातील हाडोळती, किनगाव, अंधोरी, खंडाळी, रोकडा सावरगाव या सहा महसूल मंडळातील शेतक-याच्या तुरीचा खराटा झाला आहे. गतवर्षीही तुरीच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते पण शासनाकडून शेतक-यांना कसलाही आधार मिळाला नाही. शेतक-यांनी तुरीच्या पिकाचा विमा भरला होता. पिकाचे फार मोठे नुकसान होऊनही हक्काचा पीक विमा सुद्धा शासनाकडून देण्यात आला नाही. यामुळे शेतक-याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. यावर्षीही हातातोंडाशी आलेले तुरीचे पीक सारखे आभाळ येणे, व धुक्यामुळे तुरीची फुले चक्क गळून गेली आहेत. माळावर तुरीचा चक्क खराटा झाला आहे. काही ठिकाणी तूर आपोआप वाळुन गेली आहे.याची शासनाने पाहणी करून, पंचनामे करून शेतक-यांंना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ज्या शेतक-यानी आपल्या तुरीला पाणी दिलेले आहे. ज्यांची जमीन काळीभोर, कसदार आहे,अशा ठिकाणी थोड्या शेंगा लागलेल्या दिसत आहेत. या तालुक्यातील जास्त जमीन ही डोंगराळ, माळराण, हलकी अशीच आहे. यामुळे तुरीची फुले करपून, गळून गेल्यामुळे तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दूषित निसर्गामुळे शेतक-यांच्या पदरात काहीच पडणार नाही. शेतक-यांना यांचा आर्थिक फटका बसला आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्यात यावे व शेतक-याना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबरोबरच पीक विमा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवानंद भोसले, मच्छींंद्र कांडनगिरे, विठ्ठल सारोळे, सादिक भाई शेख, शादुल शेख ,ज्ञानोबा बिलापट्टे, अशोक महाकेआदी शेतक-याच्या स्वक्ष-या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या