22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरआमदार धिरज देशमुख, अ‍ॅड. प्र्रमोद जाधव यांच्या निवडीबद्दल रेणापुरात आनंदोत्सव

आमदार धिरज देशमुख, अ‍ॅड. प्र्रमोद जाधव यांच्या निवडीबद्दल रेणापुरात आनंदोत्सव

एकमत ऑनलाईन

रेणापूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी आमदार धिरज विलासराव देशमुख व व्हाईस चेअरमनपदी अ‍ॅड. प्रमोद जाधव यांची निवड झाल्याबद्दल रेणापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री तथा सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकारी पॅनलचे १९ पैकी १८ संचालक विजयी झाले.

सोमवारी दि. ६ डिसेबर रोजी नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांची निवड बिनविरोध होऊन यात चेअरमनपदी ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांची तर व्हा. चेअरमन पदी रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव यांची निवड करण्यात आली. ही निवड होताच रेणापूर शहरासह तालुक्यातील गावात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोउत्सव साजरा करण्यात आला.

निवडीनंतर बँकेचे नूतन व्हा. चेअरमन अ‍ॅड. जाधव यांनी सोमवारी सायंकाळी पानगाव येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिचे दर्शन घेतले तसेच रेणापूरचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

यावेळी रेणापूर तालुका संगायो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, गुलाब चव्हाण व रेणापूर येथे संगायो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीन अली सय्यद, माजी संचालिका इंदुबाई इगे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा पुजा इगे, गायकवाड ताई, राम पाटील, उटगे, नागनाथ दळवी, नगरसेवक भूषण पनुरे, अनिल पवार पंडित माने, विजयकुमार एकुरके, मनोहर व्यवहारे, दादाराव कांबळे, मुकेश राजे, गणेश कलाल, अजय चक्रे, प्रदिप काळे, सतीश चव्हाण, रोहित गिरी संजय विरुळे, रहिम पठाण, अभिजीत काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या