लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित कै. बी .व्ही. काळे मांजरा आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बस स्टँड च्या पाठीमागे, गांधी मैदान लातूर येथे सर्व रोग निदान शिबिर व मोफत उपचार याचे सोमवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधी मध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये सांधे व मणक्याचे आजार, मणका सरकणे, झिजने तसेच आमवात, गाठीवात, लकवा, लठ्ठपणा या आजारावर निदान व उपचार तसेच या शिबिरात नोंद झालेल्या रुग्णांना पंचकर्म चिकित्सेत ५० टक्के सूट देण्यात येणार आहेत. यात विविध केरालियन प्रक्रिया, अभ्यंग, स्टीम बाथ, कायसेक, बस्ती इत्यादी चा समावेश आहे. यावर डॉ. पवार आनंद, डॉ. स्मिता मुळे, डॉ. कांबळे वंदना आणि डॉ. रविकिरण नाईकवाडी हे वरील आजारावर चिकित्सा करणार आहेत.
तसेच मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया तसेच शरीर वरील गाठी यावर निदान आणि उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिरात नोंद झालेल्या रुग्णांना शस्त्रकर्म चिकित्सेत दरात ५० टक्के सुट देण्यात येणार आहे. यावर डॉ. अजित जगताप, डॉ संतोष स्वामी आणि डॉ. गणेश मलवाडे हे चिकित्सा करणार आहेत.
२२ वर्षापासून शिबिराचे आयोजन
मागील २२ वर्षापासून हे महाविद्यालय मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातुन लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आरोग्य शिबिर घेवून गरीब रुग्णांना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देत आहे. महाविद्यालयात व रुग्णालयात सर्व उपचार, औषधी, पंचकर्म तसेच रक्त तपासणी, सोनोग्राफी या अल्पदरात केल्या जातात, आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. वरील शिबिराचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रो. पवार आनंद व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत चव्हाण यांनी केले आहे.