लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी स्वंय अर्थसहित शाळांची नोंदणी प्रक्रीया सुरू झाली असून आजपर्यंत १७३ शाळांची नोंदणी झाली आहे. या शाळांना नोंदणीसाठी शिक्षण विभागाने दि. १० फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ दिली आहे. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के (आरटीई) मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया स्वंय अर्थसहित, ज्या शाळांना अनुदनान नाही अशा शाळांच्या नोंदणी नंतर सुरू होणार आहे.
गेल्यावर्षी लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे गेल्यावर्षी २१९ शाळांची नोंदणी झाली होती. या शाळेतील १ हजार ७३५ जागेपैकी पाच फे-यामध्ये १ हजार ४११ प्रवेश झाले होते. तर ३२४ जागेच्या प्रवेशासाठी विद्यार्थीच आले नसल्याने त्या जागा रिक्तच राहिल्या होत्या. यावर्षी आरटीईतंर्गत २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी स्वंय अर्थसहित शाळांची नोंदणी दि. २३ जानेवारी पासून सुरू झाली आहे. ती प्रक्रीया दि. ३ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करण्याच्या स्वंय अर्थसहित शाळांना शिक्षण विभागाने सुचना दिल्या होत्या. आजपर्यंत १७३ शाळांनी आरटीई मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी नोदणी केली असून या शाळांना दि. १० फेबु्रवारीपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.