26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरआर्थिक गुंतवणुकीसंदर्भात साक्षरतेची गरज

आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात साक्षरतेची गरज

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जागतिकीकरणाच्या युगात जागतिक पातळीवर आणि समाजजीवनात वावरत असताना प्रत्येक व्यक्तींनी आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात जागरुक असले पाहिजे. कारण शेअर मार्केट, मिच्युअल फंड, एनपीएस, सेबी आदींचे परिपूर्ण ज्ञान असले पाहिजे. यातूनच आपणास आर्थिक नियोजन करता येते. आर्थिक नियोजन आणि योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक केली तरच स्वत:चे, कुटुंबाचे भावी जीवन सुरळीत चालते, अन्यथा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. गुंतवणुकीसंदर्भात परिपूर्ण ज्ञानाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सेबी आरपीचे डॉ. ब्रिजमोहन दायमा यांनी केले.

येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील युवती कल्याण मंडळ आणि सेबी व आयएसओसीओ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २८ नोव्हेंबर या ‘जागतिक गुंतवणूक सप्ताहा’ च्या निमित्ताने कार्यकारणीसाठी आर्थिक शिक्षण या विषयावर एक दिवसीय
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते साधन व्यक्ती व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दायमा बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सारिका दायमा, उपप्राचार्य डॉ. एस.एस. बेल्लाळे, कार्यशाळा समन्वयक प्रा.शितल पाटील व प्रा. श्वेता लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सारिका दायमा यांनीही पैसा हे जीवन जगण्याचे महत्वपूर्ण साधन असून आर्थिक गुंतवणूक करत असताना अल्प कालावधीत जास्त पैसा मिळविण्याच्या मोहाला कधीही बळी पडू नये. कारण या जगात वेगवेगळ्या स्कीमच्या नावाखाली ऑनलाईन, ऑफलाईन अशा कोणत्याही पद्धतीने फसवणूक होऊ शकते. म्हणूनच सोशल मीडिया, लॉटरीच्या स्कीम आदि संदर्भात सावध असले पाहिजे.डेबिट, क्रेडिट कार्ड,बँक अकाऊंट यांचा पासवर्ड कोणालाही सांगू नये.राष्ट्रीयकृत बँक,सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक केली पाहिजे.सेबी हे भांडवल बाजाराचे नियमन करते,त्याचे ज्ञान असले पाहिजे,असे त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड अध्यक्षीय समारोप केला.

प्रास्ताविक प्रा. शितल पाटील यांनी केले तर आभार प्रा. श्वेता लोखंडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. पूजा सोनसाळे यांनी केले. यावेळी वित्तीय शिक्षा पुस्तिकाचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या