उदगीर: बबन कांबळे
उदगीर शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. शहरातील नांदेड बिदर रोड, देगलूर रोड आणि शहरातील गल्लीबोळे व मुख्य रस्त्यावरून, महाविद्यालयांच्या परिसरात धूम स्टाईलने दुचाकी वाहने चालविण्याची संख्या शहरात वाढत आहे. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी सुसाट वेगाने चालविणा-या दुचाकीस्वाराच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलासह इतर अनेक युवकाजवळ वाहन,चालवण्याचा परवाना नसतानाही.आपले वाहन धूम स्टाईलने चालविण्याचा उदगीर शहरात वाढला आहे.
ग्रामीण भागातील अनेक मुली मुले दररोज हजारोच्या संख्येने महाविद्यालयांसाठी उदगीर शहरात ये-जा करतात. शहरातील तरुण दुचाकी चालविताना वेगाची मर्यादा पाळत नसल्याचे दिसून येत आहे व ट्रिपल सीट वाहतूक करीत वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत आहेत.उदगीर शहरातील चौका चौकात असे प्रकार दिसून येत आहे. उदगीर शहरातील प्रमुख मार्ग रस्ते दर्जेदार झाले आहेत. अशा ठिकाणी सुसाट वेगाने दुचाकी चालवणारे तरुण दिसून येतात.
शहरातील मुख्य चौक प्रमुख रस्ते आणि विद्यालय मुले मुली त्रासली असल्याचे दिसून येते. चौका चौकातील पोलिसांची नजर चुकूऊन बेफामपणे वाहन चालवत असल्याचे शहरात पाहायला मिळत आहे. सध्या शहरात सुसाट वेगाने व कर्णकर्कश आवाजाच्या धावणा-या दुचाकीला अंकुश लावणे गरजेचे आहे. शहरात अनेक महाविद्यालय अनेक विद्यालय महाविद्यालयातून सुट्टी झाल्यावर महाविद्यालयासमोर थांबणे रस्त्यावर गर्दी करणे आणि स्टंटबाजी करणे आणि वाहन चालवून मुला-मुलींना त्रास देणे. जोरात
हॉर्न वाजवीत जाणा-या दुचाकीस्वारांचा त्रास शहरात सर्वत्र दिसून येत आहे.