उदगीर : बबन कांबळे
कोरोनाच्या संकटामुळे थंडावलेल्या प्लास्टिक बंदी मोहीम पुन्हा तीव्र करण्यात आली असून याची अंमलबजावणी करण्यासाठी उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या यंत्रणेकडून स्थानिक दुकानदार, व्यापारी, गाडीवाले प्लास्टिकच्या पिशव्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या यंत्रणेने आत्तापर्यंत १४७५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केले आहेत.कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन अडीच वर्षांपासून प्लास्टिक बंदी मोहीम थंडावली होती. त्यामुळे परत प्लास्टिक पिशव्यांचा सर्वत्र वापर सुरू झाल्याने उदगीर शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर, नाल्यांमध्ये प्लास्टीक पिशव्यांचा खच साठवून पर्यावरणाचा धोका वाढू लागल्याचे दिसत आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने निश्चीत केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची साठवणूक, हाताळणी व व्यापार एक जुलैपासून बंदी आणण्याचे आदेशित केले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून उदगीर नगरपालिका मुख्याधिकारी शुभम क्यातवार यांनी उदगीर शहरांमध्ये प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्य विक्री प्रतिबंध केली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी कार्यालयातील ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन केले आहे. हे पथक स्थानिक दुकानदार, व्यापारी, गाडेवाले आणि उदगीर शहरातील प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर विशेष नजर ठेवून आहेत हे पथक दुकानदार व्यापारी बाजारपेठेत अचानक धाडी टाकत आहेत. या पथकाने आतापर्यंत ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला
आहे. याउपर जर प्रतिबंधक प्लास्टिक पिशव्या वापराची प्रक्रिया बंद झाली नाही तर संबंधितावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियमानुसार कायदेशीर दंडात्मक कारवाई तसेच खटले दाखल करावे. लागतील संबंधितांनी कायद्याचे व सूचनेचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी केले आहे.