18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूरउदगीर-शिरुर ताजबंद राज्य मार्गावर पडले खड्डे

उदगीर-शिरुर ताजबंद राज्य मार्गावर पडले खड्डे

एकमत ऑनलाईन

हाळी-हंडरगुळी : नांदेड-बिदर राज्य मार्गावरील रस्त्यावर एक-एक फूट खोलीचे खडे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.परिणामी एखादे वाहन धावले की वाहनाच्या पाठीमागे धुळीचे लोट निर्माण होत आहेत हाळी ते शिरुर ताजबंद पुढे उदगीर रस्त्याची अवस्था फारच बिकट बनली आहे. अहमदपूर-शिरुर हाळी हंडरगुळी उदगीर मार्गे नांदेड- बिदर हा राज्यमार्ग जातो. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी,जीप, टमटम, बसेसह अवजड वाहनांची सतत ये-जा असते. याशिवाय ऊस तोडणी सुरू झाल्यामुळे अवजड वाहनांची व ट्रॅक्टरची भर पडली.

हाळी हंडरगुळी येथील पशूंच्या बाजारास सुरुवात झाल्याने वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हाळी ते शिरुर ताजबंद दरम्यान जागोजागी मोेठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील डांबर निघाल्याने गिट्टी उघडी पडली आहे. रस्त्यावरील काही ठिकाणी पुलावर खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हाळी ते शिरुर ताजबंद दरम्यान १० किमी अंतर आहे पण हे अतंर पार करण्यासाठी अर्धा तासांचा वेळ लागत असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. प्रशासन लक्ष कधी देणार अशी चर्चा नागरीकातून होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या