22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरऊसाचे १३.९८ कोटी रुपये बील अदा

ऊसाचे १३.९८ कोटी रुपये बील अदा

एकमत ऑनलाईन

लातूर : विलास सहकारी साखर कारखाना ली. चा गळीत हंगाम सन २०२१-२२ ची सुरुवात गतीने झाली आहे. या हंगामात गाळप झालेल्या सभासद व शेतक-यांच्या ऊसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवाराच्या धोरणा प्रमाणे गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता २ हजार २०० रूपये अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे १३.९८ कोटी रुपयांची बिले वर्ग करण्यात आली आहेत. तसेच कारखान्यातील कायम व कायम हंगामी कर्मचारी यांना १२ टक्के वेतनवाढ १ नोव्हेबरपासून देण्यात आली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उभारणी करुन यशस्वी वाटचाल करीत असलेल्या वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना गळीत हंगामाची सुरुवात झाली आहे. या गळीत हंगामात सभासद आणि कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे. कारखाना विद्यमान गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, सहकारमहर्षी माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सुरु आहे.

विलास सहकारी साखर कारखाना ली. चा गळीत हंगाम सन २०२१-२२ ची सुरुवात गतीने झाली असून हंगामात ८४ हजार ५०२ मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्याच्या तांत्रीक कार्यक्षमतेचा पूरेपूर वापर करुन गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवाराच्या धोरणानुसार प्रतिटन २ हजार २०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता अदा करण्याचा निर्णय विलास कारखान्याने सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार गळीतास आलेल्या उसाला एफ.आर. पी. ऊस दरापोटी प्रति मे. टन २२०० रुपयां प्रमाणे अग्रीम उचल अदा करण्याचा घेतला आहे.

या निर्णयानुसार ३० नोव्हेंबर पर्यंत गळितास आलेल्या ६३ हजार ५४१ मे. टन ऊसाला कारखान्याकडून एफ.आर. पी. ऊस दरापोटी अग्रीम उचल प्रति मे. टन २२०० रुपयांप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे. ज्या ऊस उत्पादकांचा ३० नोव्हेंबर दरम्यान ऊस गाळपास आलेला आहे. त्यांनी आपल्या बीला संदर्भात बॅक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे व्हाईा चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विलास कारखान्याकडून ऊसबीलाचा पहिला हप्ता आणि कामगारांना वेतनवाढ लागू केल्यामुळे ऊसउत्पादक आणि साखर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू असल्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, तोडणी झ्र वाहतुक व पुरक कामाचे कंत्राटदार यांचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या