लातूर : येथील खाडगाव रोडवरील यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय! या एकपात्री नाटकाचे सादरिकरण करण्यात आले. एकपात्री नाटकांने सर्वांची मने जिंकली.
सर्वात प्रथम आदर्श मुख्याध्यापिका सलीमा सय्यद यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले.विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले .मगर समर्थ या विद्यार्थ्याने मी डाँ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय!या एकपात्री नाटकाचे सादरिकरण केले.या एकपात्री नाटकांने सर्वांची मने ंिजकली.
यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा जाधव,लालासाहेब शिंदे, महादेव कांबळे,व्यंकटेश गोरे, सुधाकर होळंबे,रेखा कांबळे, स्वाती आनंदा, सुवर्णा भालेकर, संगिता भालेकर, चित्रा पवार, पांडुरंग देडे, हरिभाऊ पाडे, चांगदेव कोळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.