23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरएकाच रात्री सहा घरे फोडली

एकाच रात्री सहा घरे फोडली

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील कोळनूर येथे दि. २२ ऑगस्ट या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील पाच ते सहा घरे फोडली असून , यामधून त्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील उमाकांत काळे, रमेश चोले, शिवाजी चोले, जीवन पांचाळ, यांचे घर चोरट्यांनी दि २२ ऑगस्टच्या रात्री फोडले. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रमेश चोले यांच्या घरातील वीस हजार रुपये, लंपास केले तर अन्य ठिकाणाहून सोन्याचे नेकलेस लंपास केले तसेच अन्य घरात घुसून घरातील वस्तूची नासधूस केली. यापूर्वी देखील काही महिन्यापूर्वी कोळनूर येथे चोरट्यांनी घरपोडी करून लाखोंचा ऐवज लुटला होता पुन्हा एकदा जळकोट तालुक्यामध्ये चोरट्यांनी डोके वर काढले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जळकोट शहरातील दत्त मंदिर मध्ये चोरी करून चोरट्यांंनी चांदीचे मुकुट पळविले होते. जळकोट पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या