29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरओबीसींच्या १६ जागांवर गंडांतर

ओबीसींच्या १६ जागांवर गंडांतर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात २१ डिसेंबरला होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. अन्य जागांसाठी मात्र निवडणु होईल, असा निर्णय राज्य निवडणुक आयोगाने घेतला. या निर्णयाने लातूर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीतील ओबीसींच्या १६ जागांवर गंडांतर आले आहे. राजकारणातील साठमारीत ‘ओबीसींच्या’ मुळावर आली, अशी प्रतिक्रीया जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी दिली आहे.

राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुक कार्यक्रमानूसार लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ व चाकुर या चार नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. या चारही नगरपंचायतींत २ ओबीसी महिला व २ ओबीसी असे प्रत्येकी ४ एकुण १६ जागा ओबीसींच्या आहेत. ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. चारही नगरपंचायतींमधील ओबीसींच्या १६ जागांसाठी असंख्य इच्छूक ओबीसी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच चारही नगरपंचायतींतील ओबीसी प्रभागांतील निवडणुकीला स्थगिती दिल्याचा ‘मेल’ दुपारी २.३० वाजता स्थानिक निवडणुक विभागाला मिळाला आणि स्थानिक निवडणुक विभागाने ओबीसी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे थांबवले.

राज्य निवडणुक आयोगाने ओबीसी प्रभाागांतील निवडणुक स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ व चाकुर नगरपंचायती निवडणुकीतील इच्छूक उमेदवारांना मोठा धक्का बसला. ओबीसींच्या राजकीय हक्कावर गदा आल्याची तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणुक आयोगाचा निर्णय येईपर्यंत चारही नगरपंचायतीमधील ओबीसी प्रभागांतून असंख्य इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र या निर्णयामुळे आता या उमेदवारी अर्जांना काहीच अर्थ उरत नाही. पुढील आदेश
येईपर्यंत ओबीसी प्रभागांतील निवडणुकीला स्थगिती असणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या