22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरऔरादला पावसाचा तडाखा, वीज पडून एका व्यक्तीसह दोन म्हशी दगावल्या

औरादला पावसाचा तडाखा, वीज पडून एका व्यक्तीसह दोन म्हशी दगावल्या

एकमत ऑनलाईन

निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा शहरासह तालुक्यात दि ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल. जोरदार झालेल्या पावसाने रस्ते जलमय होऊन रस्त्याला तलावाचे स्वरुप आले. गटारी भरून रस्त्यावरील पाणी दुकानात घुसले. वीज पडून तालुक्यात एका व्यक्तीसह दोन म्हशी दगावल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी ‘एकमत’शी बोलताना दिली.

निलंगा शहरासह तालुक्यात सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसाने झोडपले. जोरदार झालेल्या पावसाने अक्षरश: रस्त्याला तलावाचे स्वरुप आले होते. नाले, गटारी तुडुंब भरुन रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीची शहरात कोंडी निर्माण झाली होती. निलंगा औराद रस्त्यावर अटलवाक जवळ गटार तुडुंब भरून रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. रस्त्याला तलावाचे रुप आले. दरम्यान औराद शहाजानी येथे ढगफुटी होऊन दोन तासात १४५ मीमी पाऊस झाला असल्याची औराद हवामान केंद्रात नोंद झाली असल्याचे मुकरम नाईकवाडे यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगितले.

या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. दरम्यान सायंकाळी सहाच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात तालुक्यातील दापका येथील बाबुराव खंडू सुरवसे, वय ५० वर्षे हे त्यांच्या शेतात वीज पडून मयत झाले तर आनंदवाडी ( शि.को. ) येथील शेतकरी बालाजी गंगाराम शिंदे यांची एक म्हैस व दगडवाडी येथील विनायक रामा भोसले यांची एक म्हैस असे तालुक्यात एका व्यक्तीसह दोन म्हशी दगावल्या आहेत. जोरदार झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले.

दोन तासांत १४५ मि. मी. पाऊस, हाय-वे बंद
गुरुवारी सायंकाळी औरादसह परिसरातील तगरखेडा हलगरा सावरी माकणी शिरसी हंगरगा आधी निलंगा तालुक्यातील भागांमध्ये ढगफुटी पाऊस झाला सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत तब्बल दोन तासात १४५ मिलीलीटर पाऊस या भागात झाल्याची नोंद औराद शहाजानी हवामान केंद्रावर झाली आहे. या पावसामुळे औरादच्या मुख्य रस्त्यासह हाय-वे बंद झाला आहे. या अचानक झालेल्या वादळी वा-यासह पावसाने तगरखेडा हलगरा, औराद परिसरात हाहाकार उडाला. लातूर-जहीराबाद महामार्गावर दोन ते अडीच फूट पाणी वाहत होते. या महामार्गाचे पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेकडो दुकानांमध्ये व घरामध्ये शिरल्याने व्यापारी व नागरिकांचे लाखोंची नुकसान या पावसाने झाले आहे महामार्ग शेजारील हाँटेल मेडिकल किराणा खत फर्निचर आदी दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेत शिवारातील पिकांचे नुकसान अतोनात झाले आहे औराद इथून जाणा-या अनेक गावांना जोडणारे रस्ते यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे . हे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत तर औराद शहरातील बसस्थानक भागात पाणी साचल्याने मुख्य रस्ता गावात जाणारा वाहतुकीसाठी दोन तास बंद झालेला होता तेरणा नदीवरील सर्व बंधार्याची दारे पुन्हा एकदा उघडण्यात आली आहेत नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या