28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरऔराद शहाजानी बनले पुन्हा अवैध धंद्याचा अड्डा

औराद शहाजानी बनले पुन्हा अवैध धंद्याचा अड्डा

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी शहरासह परिसरातील गावात मध्यंतरी कोरोना महामारीच्या कालखंडात बंद असलेले अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने पुन्हा एकदा जोमात खुलेआम सुरू झाल्याने औराद शहाजानी हे शहर अवैध धंद्याचा पुन्हा अड्डा बनले आहे. औराद शहाजानी हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मुख्य बाजार पेठ असलेले शहर आहे . या परिसरात कर्नाटक राज्यातुन अनेक रस्ते महाराष्ट्राशी जोडले जातात . यामुळे महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा लाखोची आवक व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त असल्याने हजारो लिटर ज्वलनशील पदार्थ अवैध रित्या सर्रासपणे आणले जाते. महाराष्ट्रात विदेशी मद्य स्वस्त असल्याने कर्नाटक राज्यात विक्रीसाठी नेले जाते.

सोबतच दुचाकीची चोरी, मटका ,जुगार, अवैध दारू विक्रीने अक्षरश: थैमान घातले आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीची प्रशासन दखलही घेत नाही. अनेक तक्रारी अर्ज पोलिस प्रशासनाकडे नागरिकांनी दिले मात्र यावर पोलिस प्रशासन कार्यवाही प्रशासन करीत असताना दिसत नाही यामुळे या अवैध व्यवसायिकांविषयी नेमकी दाद मागावी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले मात्र पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रशासनाविषयी नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अवैध धंद्याचा त्रास महिला, शाळकरी मुले व नागरिकांना होत असल्याने वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. याबाबत माजी पंचायत समिती सदस्य तानाजी पाटील यांनी औराद शहाजनी , हलगरा यासह अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री व मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या