36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरऔसा तालुक्यातील ४४० शेत रस्ते होणार

औसा तालुक्यातील ४४० शेत रस्ते होणार

एकमत ऑनलाईन

औसा : औसा विधानसभा मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियानाच्या दुस-या टप्याला सुरुवात झाली असून दि.२१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते ८३३ किलोमीटर लांबीच्या ४४० शेतरस्त्यांच्या माती व दबई कामाचे उ्द्घाटन ऑनलाईन करण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी दुशिंंग, रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, औसा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे व निलंगा उपविभागीय अधिकारी सौ शोभाताई या जाधव उपस्थित होत्या.

औसा विधानसभा मतदारसंघातील शेतक-यासाठी ५ डिसेंबर २०२० हा जागतिक मृदादिन ऐतिहासिक दिवस ठरला कारण याच दिवशी मतदारसंघातील आलमला (ता.औसा) येथून आमदार अभिमन्यू पवार यांनी आपला संपूर्ण निधी शेतरस्त्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला होता.शेतरस्ते हा शेतक-यासाठी क्रांतीकारक विषय आहे. यामुुळे शेतक-याच्या जीवनात आमुलाग्र बदल होईल. ज्यामुळे शेतक-याना शेतरस्ते उपलब्ध होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळता येईल. शेतक-याच्या बांधापर्यंत शेतरस्ता असावे हे आपले स्वप्न असल्याचे सांगून ५ फेब्रुवारी २०२० रोजी उंबडगा येथून एकाच वेळी औसा तालुक्यातील ६१ गावांतील ४१४ किलोमीटर लांबीच्या १५३ शेतरस्ते कामाचे तर निलंगा तालुक्यातील कासारसिरसी मंडळात उस्तुरी येथे २६ फेब्रुवारीला २५ गावांतील ३१३ किमी लांबीच्या ११७ शेतरस्ते कामाचे भूमिपूजन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले होते.

त्यानंतर औसा मतदारसंघात शेतरस्ते विकासाचे एक अभियान उभे राहिले. मतदारसंघातील प्रत्येक शेतक-यास शेतरस्ता उपलब्ध करून देण्याचे वचन आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले असून मागच्या वर्षी पहिल्या टप्यात ६४० किमी लांबीच्या शेतरस्त्यांचे मातीकाम करण्यात आले आहे. तसेच जवळपास २०० किमी लांबीच्या शेतरस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण कामे पूर्ण झाली आहेतकिंवा प्रगतीपथावर आहेत. यावर्षी उर्वरित खडीकरण व मजबुतीकरण कामे पूर्ण करण्यासह अधिकाधिक रस्त्यांचे मातीकाम पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. शेती हे शेतक-यांचे ह्रदय तर शेतरस्ते या रक्तवाहिन्या असतात.
\
अनेक ठिकाणी या रक्तवाहिन्या सध्या ब्लॉक झाल्या असून त्या मोकळ्या करण्यासाठीच संपूर्ण आमदार निधी शेतरस्त्यांसाठी वापरण्याचा संकल्प केला असल्याचे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतक-याना आवाहन केले होते.
सर्वसहमतीने आपापल्या शिवारातील नकाशावरील शेतरस्ते मोकळे करा, आवश्यकता असलेले शेतरस्ते प्रस्तावित करा, चांगले शेतरस्ते तयार करून देण्याची जबाबदारी माझी राहील.त्याच्या या आवाहनाला शेतक-यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज मतदारसंघात शेत रस्ते कामाचे हे अभियान यशस्वी होताना दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या