औसा : लातूर येथील ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७२ फूट उंच पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी जिल्हा दौ-यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे औसा मतदारसंघातील लामजना पाटी येथे आमदार अभिमन्यू पवार व भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लामजना पाटी येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, लहू कांबळे, औसा नगरपरिषदेचे माजी गटनेते सुनील उटगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष .भिमाशंकर राचट्टे, सुशीलदादा बाजपाई, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, दत्ता चेवले, माजी जिल्हा परिषद सदस्य बंकट पाटील, शिव मुरगे, संजय कुलकर्णी, दत्ता पाटील, बाबासाहेब पाटील, बालाजी निकम, तुराब देशमुख, जयपाल भोसले, सचिन अनसारवाडे, प्रतीक पाटील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.