24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरऔसा येथे उद्या आचार्य भातखंडे संगीत समारोह

औसा येथे उद्या आचार्य भातखंडे संगीत समारोह

एकमत ऑनलाईन

औसा : औसा येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आचार्य भातखंडे संगीत समारोहाचे आयोजन दि ४ व ५ डिसेंबर रोजी श्री मुक्तेश्वर देवस्थान उंबडगा रोड औसा येथे करण्यात आले आहे. या २ दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत होणार असून आचार्य भातखंडे संगीत समारोह चे हे १० वे वर्ष आहे.

पं .शिवरुद्र स्वामी यांच्या प्रयत्नानेआचार्य भातखंडे संगीत समारोहाच्या माध्यमातून शास्रीय संगीत प्रेमी नागरिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ख्यातनाम संगीतकारांची मेजवानी मिळत आहे. या संगीत समारोह कार्यक्रमांत तबला,सोलो पंडित राम बोरगावकर, गणेश बोरगावकर आणि स्वरित पांचाळ तर शास्त्रीय गायन किशोरी मुरकेझरीकर, सूरमणी भुजंग मुरके झरीकर, शिवरुद्र स्वामी यांची मेजवानी मिळणार असून या संगीत समारोहामध्ये पंडित दीपक लिंगे हे हर्मोनियम सोलोच्या माध्यमातून साथ-संगत करणार आहेत व पं. विठ्ठलराव जगताप यांचे शास्त्रीय गायन होणार आहे, अशी माहिती पं. शिवरुद्र स्वामी, शिवाजी भातमोडे, नरसिंग राजे कुंभार यांनी दिली . यावेळी अ‍ॅड. शाम कुलकर्णी, हणमंतराव लोकरे, जाधव हे उपस्थित होते. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनील चेळकर, व्यंकट राऊतराव यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या