36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरऔसा शहर तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण कामास गती

औसा शहर तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण कामास गती

एकमत ऑनलाईन

औसा : औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन क्षेत्रात समाविष्ठ होत असलेल्या बांधकामाचे मूल्यांकन करण्यासाठी भूसंपादन अधिकारी तथा औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना स्मरण पत्र दिले आहे .याकामासाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी औसा शहरातील तिस-या टप्प्यातील रस्ता रूंदीकरण भागात १६ जानेवारी २०२१ रोजी येऊन पाहणी करून रूंदीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन तिसरा टप्पा रूंदीकरण कार्यासाठी गतीने चालना दिली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांना औसा शहर रस्ता रुंदीकरण तिसरा टप्पा भूसंपादन व विकासासाठी निधी मंजूर करून देण्याबाबतचे निवेदन दिले. त्यानंतर औसा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी अमर खानापुरे यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे औसा शहरातील रस्ता रुंदीकरण तिसरा टप्पा भूसंपादन व रस्ता विकसित करण्यासाठी साडे सहा कोटी रुपये निधी मंजूर करून द्यावा अशा आशयाचे मागणीपत्र सादर केले. याची दखल घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी तिस-या टप्प्यातील डी.पी.रोड याकरिता २.०० कोटी व भूसंपादनाकरिता ४.५० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले

यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी ३० जुलै २०२१ तारखेचा संदर्भ देत औसा शहर विकास योजनेतील लातूर वेस ते जामा मस्जीद रूंदीकरण टप्पा क्र.३ साठी भूसंपादन क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या कामांचे मुल्यांकन लवकर करून मुल्यांकन अहवाल तात्काळ विनाविलंब कार्यालयास सादर करण्यात यावा असे स्मरण पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर यांना सादर केले. औसा शहरातील लातूर वेस ते जामा मस्जीद रस्ता रुंदीकरण तिसरा टप्पा हे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते ते आता मार्गी लागणार आहे. यामुळे गैरसोईतून नागरिक मुक्त होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या