निलंगा : लातूर जिल्ह्यात माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी घेतली असून निलंगा विधानसभेतील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात काँग्रेसने एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निलंगा तालुक्यातील ६८ पैकी ५० ग्रामपंचायत काँग्रेसने जिंकले आहेत. तसेच देवणी तालुक्यात झालेल्या ८ ग्रामपंचायत पैकी ६ ग्रामपंचायत व शिरुर अनंतपाळ तालुक्यात ११ पैकी ८ ग्रामपंचायती वर काँग्रेसने झेंडा फडकवला आहे.
भाजपकडून मात्र केवळ पोकळ दावे केले जात आहेत. त्यामुळे भाजपचे दावे गावागावात विनोदाचा विषय बनले आहेत. कारण गावातील जनतेला आपल्या गावात विजयी झालेल्या पॅनलचा पॅनल प्रमुख, सरपंच काँग्रेसचा आहे हे माहीत असतानाही आपल्याच ग्रामपंचायतीवर भाजप दावा करते, हे ऐकुन लोक हसत आहेत. त्यामुळे अशा खोटारडेपणामुळे आमदार व त्यांचे बंधू पोरकटपणा करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायतमधील विजयाच्या वातावरणामुळे निलंगा विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येणारी निलंगा नगर परिषद व लातूर जिल्हा परिषद वर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असा आत्मविश्वास साळुंके यांनी व्यक्त केला आहे.
तसेच भाजपच्या पोकळदाव्यामुळे लोकात गैरसमज पसरु नये म्हणून आम्ही काँग्रेसच्या निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ या तिन्ही तालुकाध्यक्षांच्या स्वाक्षरीसह काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायत यादीच या प्रसिद्धी पत्रकासह जोडली आहे. त्यामुळे भाजपा आमदार व त्यांच्या बंधूंनी यापुढे पोकळ दावे करू नये अन्यथा समोरासमोर सरपंच व पॅनल प्रमुख तसेच उपसरपंच यांचे शक्ती प्रदर्शन करण्याची आम्ही आव्हान देत आहोत असेही साळुंके यांनी आव्हान दिले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल तालुका निलंगा- लिंबाळा, भुतमगळी, हरीजवळगा, शेंद, मुगाव, मसलगा, शिरसी हं, हंगरगा, जामगा, सोनखेड, सांगवी जे, जेवरी, हाडोळी, हणमंतवाडी हा, हालसी हा., हासोरी खु., झरी, जाऊ, चिंचोली भं., चिंचोली स, मन्नथपुर, सिंदखेड, तुपडी, शिवनी को., माकणी थोर, तळीखेड, चिलवंतवाडी, हालसी तु, तांबरवाडी, मिरगन हळ्ळी, तांबाळा, धानोरा, मदनसुरी, बोटकुळ, अंबुलगा बु, पानंिचचोली, निटूर, चिचोंडी, हलगरा, राठोडा, रामंिलग मुदगड, येळनूर, गुंजरगा, चांदोरी, उमरगा हा, दापका, अनसरवाडा, बोरसुरी, माने जवळगा, ममदापूर. शिरुर अनंतपाळ तालुका उजेड, राणी अंकुलगा, दैठणा, तळेगाव बोरी, वांजरखेडा, आजनी, रापका, बेवनाळ. देवणी तालुका बोरोळ, हेळंब, सय्यदपूर, टाकळी, बोंबळी, वडमुरंबी. या सर्व ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, असे अभय साळूंके यांनी सांगीतले.