29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरकिल्लारी ग्रामपंचायतीस ठोकले टाळे

किल्लारी ग्रामपंचायतीस ठोकले टाळे

एकमत ऑनलाईन

किल्लारी : किल्लारी येथे येथे दि ७ मंगळवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गोंधळ झाला. एका वर्षापासून नळाला पाणी नाही, रस्त्याचा प्रश्न, वीज, १५ वीत्त आयोगातील निधीचा खर्चाचा हिशेब मान्य नाही यावरून गोंधळ निर्माण झाला. यावेळी वाद विकोपाला जाऊन दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी शाब्दीक चकमक झाल.ी.

शिक्षक सुधीर सगर व ग्रामपंचायत सदस्या सुलक्षणा बाबळसुरे यानी एक वर्षापासुन नळाला पाणी नाही ,गावात रस्ते नाही, लाईटचा प्रश्र तसेच महत्त्वाचा प्रश्न १५ वा वित्त आयोगातील निधीचा खर्चाचा हिशेब व तो आम्हाला मान्य नाही असे म्हटल्यावरून गोंधळ निर्माण झाला दरम्यान गटविकास अधिकारी ग्रामसभेस उपस्थित का नाहीत अशी विचारणा करीत काहींनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले. पोलिस ठाण्यासमोरही महिला- पुरुषांनी गर्दी केली शेवटी ग्रामविकासअधिकारी टी.डी. बिराजदार याच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्या सुलक्षणा धनराज बाबळसुरे व शिक्षक सुधीर व्यंकटराव सगर यानी मला ग्रामपंचायत कार्यालयात काम करावयाचे आहे म्हणून विनंती केली तरीही कुलूप काढले नाही. सध्या किल्लारीत ग्रामपंचायतची पोटनिवडणूक सुरू आहे.

यावेळी शासकीय कामात आडथळा आणला म्हणून कलम १८८,१८६,३४१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सपोनी सुनील गायकवाड करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या